लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आयआयटीसह इतर इंजिनीअरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जळगाव शहरातील मनिष मुकेश भावसार हा ९९.०१ तसेच हर्षिता जाजू ९८.८५ तर सुनय हेमंत पाटील हा ९८.७० पर्सेंटाइल मिळून यश संपादन केले आहे.
पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घेतली. सोमवारी या जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात जळगाव शहरातील मनिष भावसार, हर्षिता जाजू व सुनय पाटील यांच्यासह भूमिका भंगाळे (९७.०२ पर्सेटाईल), ओम जैन (९५.४६), प्रज्वल पाटील (९५.२७), स्रेहा बंकर (९३.२१), विश्वेष इंगळे (९२.३९), योजना फेगडे (९१.८४), सिद्धांत तांबटकर (९०.९२), अभय शेवाळे (९०.६२), दर्पण नेवे (९०.०२), समीर शहा (८९.५५), भुषण सोनसाळे (८८.५६), उमाकांत महाजन (८७.७६), यश इंगळे (८७.९१), सोहम राणे (८५.६४), उत्कर्षा गवई (८४.८६), प्रेम देशमुख (८४.५१), रोणित भावसार (८४.४६), ऋतुपर्ण काकडे (८३.४५), दिग्विजय पाटील (८१.८३) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.