मागील वर्षी कोरोना महामारीमुळे एनएमएमएस परीक्षा पुढे ढकलून शेवटी फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यात विद्यालयाचे ५२ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यातील २५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात धनश्री भोंबे, जिज्ञासा खोडके, अंजली महाजन, साक्षी शेळके, पल्लवी परदेशी, कल्याणी परदेशी, दामिनी शिंपी, वर्षा परदेशी, हर्षदा भोंबे, हर्शिता गोरे, कविता बाविस्कर, रिया सोनवणे, स्वप्निल मगरे, वैभव खरे, अक्षय पाटील, यश बावस्कर असे १६ विद्यार्थी विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरले, त्या विद्यार्थ्यांना वर्षाला प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सतीश काशीद, सहसचिव दीपक गरुड, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, मुख्याध्यापक पी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. एस. पाटील, विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.