जळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन कंपनीत नोकरी करताना मोठे स्वप्न पाहत स्वतःचा उद्योग तर असावाच शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुरू केलेल्या उद्योगाच्या माध्यमातून जळगावातील बॅटरी चार्जर व नियंत्रण पॅनेल सातासमुद्रापार पोहोचले आहे. ही यशोगाथा आहे जळगाव जिल्ह्यातील सुभाष पाटील यांची. मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.
आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.
Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी
एरंडोल येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष पाटील यांनी मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मावस भावाच्या कंपनीत अभियंता म्हणून ते रुजू झाले, सुरुवातीपासूनच नव्याचा ध्यास असणारे पाटील हे कंपनीत काम करीत असताना नवनवीन तांत्रिक ज्ञानाचा उपयोग जिल्ह्यासाठी, देशासाठी केला, पाहिजे, असा विचार करायचे. मावस भावाच्या कंपनीत १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये मास-टेक कंट्रोल्स प्रा.लि. कंपनी सुरू केली. अल्पावधीत कंपनीने मोठी झेप घेतली व कंपनीतील बॅटरी चार्जर आणि नियंत्रण पॅनेलची उत्पादने जगभरात पसंतीस उतरु लागली.
भविष्यात विविध उत्पादने
ईव्ही विभागाव्यतिरिक्त मास टेक कंट्रोल्स पॉवर युटिलिटीज, मोटर उत्पादन उद्योग, रासायनिक उद्योग, दूरसंचार, यूपीएस प्रणाली, वैद्यकीय अनुप्रयोग इत्यादींची पूर्तता करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.
आव्हाने आपल्याला अधिक २ चांगले बनवण्यासाठी येतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यातूनच यश गाठता येते. या मंत्रातूनच जळगावात सुरू केलेल्या मास टेक कंपनीने झेप घेतली असून, कंपनीची उत्पादने आज विविध देशात पोहोचली आहेत.
रोजगार वाढीने आधार
मास टेक कंपनीचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतात सर्वप्रथम ईव्ही चार्जर कंपनीने तयार केले आहे. कंपनीने ईव्हीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर २०२३ साली देशातील नामांकित कंपनीने मास टेक कंपनीची ईव्ही ही कंपनी टेकओव्हर केली. यामुळे जळगावात अनेकांना रोजगार मिळाला आहे.
इतर देशांमध्ये भागीदारी व्यवसाय वाढीस मदत
मास टेक कंपनीने नुकतेच नॉर्वे येथील कंपनीसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. या भागीदारी व्यवसायाला युरोपियन व इतर देशांमध्ये नवीन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास आणि ग्राहक वाढविण्यास मदत होत आहे.
नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार
कंपनीच्या सेवांचा दर्जा सतत सुधारण्यासाठी सुभाष पाटील हे देशासह विविध देशातील सेमिनारमध्ये सहभागी होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतात. तांत्रिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना भेटण्याच्या संधीचा फायदा घेत आणि त्यांच्या अनुभवातून नवनवीन ज्ञानाचा साठा घेत कंपनीत त्याचा उपयोग करतात. यामुळे कंपनीने मोठी भरारी घेतली आहे.