शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

सुडाचे राजकारण पोहोचले गल्लीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:50 PM

एरंडोली

मिलिंद कुलकर्णी सत्ता ताब्यात आली म्हणजे सर्वाधिकारी झालो, अशी भावना सत्ताधारी मंडळींमध्ये असते, त्याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांमध्ये पदोपदी आला आहे. मग ती आणीबाणी असो की, तामिळनाडूमध्ये करुणानिधींना झालेली अटक असो, बळाचा गैरवापर हमखास केला जातो. लोकशाही असल्याने ‘सुपातले जात्यात’ कधी ना कधी येतात. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांना गुजराथमध्ये खोट्या चकमकप्रकरणात अटक झाली, तेव्हा केंद्रात चिदंबरम गृहमंत्री होते. त्याच चिदंबरम यांना गेल्यावर्षी शहा यांच्या अधिपत्याखालील यंत्रणांनी अटक केली होती. याला सुडाचे राजकारण म्हणता येईल. आता हे राजकारण मुंबईमार्गे गल्लीबोळात पोहोचू लागले आहे. त्याचे चटके भाजपचे जळगावातील खासदार उन्मेष पाटील यांनाही बसले. पाटील हे लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत असताना मुंबईत त्यांना फटाके लावले जात होते. बरे, यात मातब्बर उतरल्याने राज्यभर चर्चेचा विषय ठरला. या विषयाची सुरुवात झाली ती मुंबईत. निवृत्त नौदल की मर्चंट नेव्हीचा अधिकारी (त्याविषयीही वाद आहे) मदन शर्मा याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्यंगचित्र पोस्ट केले. शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. निवृत्त लष्करी अधिकाºयाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. शिवसेना व भाजपमध्ये असलेले ‘प्रेमाचे संबंध’ लक्षात घेता भाजपने हा मुद्दा उचलला आणि कारवाईची मागणी केली. झाले, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट चाळीसगावच्या माजी सैनिक सोनू महाजन यांच्या मारहाणीचा मुद्दा उकरला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात ही मारहाण झाली, पण तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यावर हा गुन्हा दाखल झाला. साडेचार वर्षांत कारवाई झालेली नाही, असे सावंत म्हणाले. लगेच दुसºया दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आणि तसा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला. कारवाईची नवी पद्धत बघायला मिळाली. चाळीसगावकरांवर अतिलोभ राज्य सरकारवर कायम टीकेची झोड उठविणाºया भाजपच्या लोकप्रतिनिधींविरुद्ध महाविकास आघाडीने मोहीम उघडली असावी, अशा पध्दतीने घटना घडत आहेत. उन्मेष पाटील यांच्यापाठोपाठ चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका आंदोलनात मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून सेनेने त्यांना कोंडीत पकडले. जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पोळ्याच्या दिवशी चाळीसगावात जाऊन आंदोलन केले. शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी यांच्यासह अनेक महिला पदाधिकाºयांनी चव्हाण यांना फोन करून जाब विचारला. त्या आॅडिओ क्लिप व्हायरल करून भंडावून सोडले. इकडे वाघळी, चाळीसगावचे भूमीपुत्र व जळगावचे आमदार सुरेश भोळे व माजी मंत्री गिरीश महाजन यांना जळगावच्या विकास कामांवरून रोज टीकेचा सामना करावा लागत आहे. राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शिवसेनेचे नीलेश पाटील, गजानन मालपुरे, एनएसयूआयचे देवेंद्र मराठे यांनी गिरीश महाजन, सुरेश भोळे आणि महापालिका यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी महाजन यांनी वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखती, भाजपने काढलेला जाहीरनामा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावकरांना व्हिडिओद्वारे केलेले आवाहन, महापालिकेत विजयानंतर महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया हे पुन्हा एकदा समाज माध्यमात आणले जात असून त्यातून कोंडी केली जात आहे. जळगावातील सफाई कामासाठी निलंबित केलेल्या वॉटरग्रेस कंपनी या ठेकेदाराला पुन्हा काम देणे, जळगावातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आणि खड्डे या विषयांना विरोधक आंदोलनाद्वारे धार चढवत आहे. एक वर्षात जळगावचा चेहरामोहरा बदलवून दाखवेल, या गिरीश महाजन यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्यावरून विरोधक जाब विचारत आहेत. विरोधकांच्या आंदोलनाला चढलेली धार, भाजपमध्ये अंतर्गत वाढलेली सुंदोपसुंदी पाहून अखेर गिरीश महाजन यांनी ७ महिन्यांनंतर महापालिकेत बैठक घेऊन नगरसेवक व अधिकाºयांचे म्हणणे जाणून घेतले. मात्र महाजन यांनी विकास का होत नाही, अडचणी काय आहे, हे मोकळेपणाने जळगावकरांना सांगितलेले नाही. महापालिकेत असो की, जी.एम. डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात असो, माध्यमांच्या प्रश्नांनादेखील ते बगल देत आहेत. काही मंजुरी बाकी आहेत, त्या आल्यावर बोलू, असे म्हणत वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या म्हणण्यात तथ्य वाटू लागण्याची शक्यता अधिक आहे. समाज माध्यमांवर विरोधकांचा प्रभाव लोकसभेची २०१४ ची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी म्हटली जाते. समाज माध्यमाचा प्रभावी उपयोग करून भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सक्षम, सबळ पोलादी पुरुष, ५६ इंच छाती अशा वर्णनाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार मैदानात उतरवला. मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्यावर टीकेचा रोख ठेवत मोदी कसे उजवे हे भाजपच्या आय टी सेलने मांडले. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुका मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आल्या. सहा वर्षात मोदी सरकारने काय केले, याचा हिशेब आता विरोधी पक्षांचे नेते, त्यांचे आय टी सेलचे कार्यकर्ते विचारू लागले आहे. नोटाबंदी, कोरोना उपाययोजना, चीनशी असलेला संघर्ष या विषयांवर काँग्रेस नेते राहुल गांधी  टिष्ट्वटरद्वारे टोकदार प्रश्न विचारत आहेत. सरकारकडून त्याला उत्तर दिले जात नाही. भाजपच्या आय टी सेलकडूनही प्रत्युत्तर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेने ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा केला. समाज माध्यमांवर बेरोजगारी हा विषय ट्रेडमध्ये असतो. समाज माध्यमाचा प्रभावी वापर करणाºया भाजपला आता विरोधकांशी त्याच आयुधद्वारे टक्कर दिली जात आहे. वस्तुस्थितीकडे फार काळ दुर्लक्ष करणे धोकेदायक ठरू शकते, हे मात्र निश्चित. ...सेक्स स्कॅँडलमधील कॅसेट १९९३ मधील जळगावातील कथित सेक्स स्कॅँडलने देशभर खळबळ माजवली होती. आतादेखील एका माजी मंत्र्याच्या पीएच्या अश्लील क्लिपचा विषय चर्चेत आला आहे. या दोन्ही प्रकरणात साम्यस्थळे अनेक आहेत. एकनाथराव खडसे यांनीच भंडाफोड केला. तेव्हाही राज्यात सत्ता काँग्रेसची होती. खडसे विरोधी पक्षात होते. नगरपालिका बरखास्त होणे यापेक्षा राजकीय हानी फार घडलेली नाही. परंतु, जळगावच्या राजकारणाचा पोत बदलला. आता २७ वर्षांनंतर पुन्हा त्याच वळणावर राजकारण आले आहे. तत्पूर्वी भाजपच्या एका लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित झाली आणि त्यांचे तिकीट कापले गेले.पण सेक्स स्कॅँडलचे भांडवल करून अनेक जणांनी राजकीय बस्तान बसविले. संशयित आरोपींचे नातेवाईक तर अजूनही राजकारणात सक्रिय  आणि पदांवर आहेत. बहुचर्चित व्हिडिओ टेप कुठे गेली, हे अजूनही कळले नाही, तसे या क्लिपचे झाले तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :Jalgaonजळगाव