कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील शेतकरी समाधान नामदेव बोरसे यांच्या पन्नासपेक्षा अधिक कोंबड्या सोमवारी दुपारी अचानक मृत्युमुखी पडल्या. यात मोठे नुकसान झाले.येथील नागद रोडवरील रहिवासी शेतकरी समाधान बोरसे यांनी आपला शेती व्यवसाय सांभाळून गावरान कोंबड्या पाळल्या आहेत. घर परिसरात त्या चराईसाठी सोडल्या जातात. नेहमीप्रमाणे त्या सोडल्या, मात्र दुपारी एका पाठोपाठ एक करीत सुमारे पन्नास कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्या परिसरात ठिकठिकाणी मिळाल्या. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात कोंबड्या मृत होण्याचे कारण मात्र कळले नाही. मात्र गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.कुकुटपालन व्यवसायधारकात घबराटएकाच वेळेस पन्नास कोंबड्या मृत झाल्याने हा व्यवसाय करणाºयांमध्ये घबराट पसरली आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पन्नासावर कोंबड्यांचा अचानक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 7:11 PM
कजगाव येथील शेतकरी समाधान नामदेव बोरसे यांच्या पन्नासपेक्षा अधिक कोंबड्या सोमवारी दुपारी अचानक मृत्युमुखी पडल्या.
ठळक मुद्देकुकुटपालन व्यवसायधारकात घबराटकोंबड्या मृत पावण्याचे कारण अज्ञात‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती