जळगाव : शेतात काम करणाऱ्या अनिल कालू भील (२५) या सालदारावर अचानक बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील म्हसावद लमांजन शिवारात शुक्रवारी सकाळी घडली. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़ दरम्यान, वनविभागाच्या अधिकाºयानी या भागात पाहणी केली.आबा एकनाथ सोनवणे हे म्हसावद येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ त्यांचे म्हसावद-लमांजन शिवारात शेत आहे़ नागदुली येथील अनिल भील नामक हा तरूण त्यांच्याकडे अडीच ते तीन वर्षांपासून सालदारकी करीत आहे़ शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास अनिल हा बैलजोडी घेवून शेतात केळीची पाहणी करण्यासाठी जात होता़ त्याचवेळी अचानक त्याच्या अंगावर बिबट्याने झडप घातली़ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या हातासह डोक्याला दुखापत झाली़अन् तो प्राण वाचविण्यासाठी झाडावर चढलाबिबट्याने हल्ला करताच अनिल याने कसे-बसे स्वत:ला सावरत बाजूलाच असलेल्या नाल्यात उडी घेतली़ नंतर समोर असलेल्या झाडावर चढला आणि त्याने आरडा-ओरड केली़ काही वेळानंतर गावातून काही ग्रामस्थ आले, तोपर्यंत अनिल याने बिबट्याला पळवून लावले होते़ हा प्रकार शेतमालक व ग्रामस्थांना कळताच त्यांनी त्वरित जखमी अनिल याला खाजगी रूग्णालयात दाखल केले़ त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे शेतमालक आबा सोनवणे यांनी सांगितले़