जळगाव : वडिलांना मारण्याची धमकी देवून दोघांनी अंगणात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने घाबरलेल्या १३ वर्षीय बालिकेने घरातच फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.बालिका व तिचा लहान भाऊ घरात असताना दुपारी दोन जण घरी आले. वडील व आई कामावर गेले होते. बाहेर निघ तुझ्या वडिलांना मारतोच, अशा शब्दात दोघांनी बालिकेस धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या बालिकेने फिनाईल प्राशन केले.बालिकेस उपचारासाठी मदत करणाऱ्या दोन्ही महिलांनाही दोघांनी अर्वाच्च भाषा वापरत ते त्यांच्या अंगावर ते धावून गेले. अशाही परिस्थितीत शेजारील महिलांनी बालिकेला जिल्हा रूग्णालयात आणले.घटनेची माहिती मिळताच पीडित बालिकेच्या आई वडिलांनी रूग्णालयात धाव घेतली. मुलीची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळले. या तरुणांनी काही दिवसापूर्वीही असाच त्रास दिल्याची माहिती बालिकेच्या आईने पत्रकारांना दिली. दरम्यान, बालिकेची प्रकृती स्थीर आहे.या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून पीडित तरुणीची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. धमकी कशामुळे देण्यात आली, पूर्वी काही या कुटुंबाशी वाद होता का? याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या धमकी प्रकरणातील एक जण खूनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्याने कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे काही पक्ष व संघटनेच्या पदाधिकाºयांनी रुग्णालयात भेट देवून कुटुंबाला आधार दिला.
वडीलांना धमकी दिल्याने मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:38 PM