आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.४ : अभियांत्रिकीचा पेपर देण्यासाठी घरातून निघालेल्या प्रदीप समाधान कोळी ( २७, रा.सुकळी, ता.मुक्ताईनगर, ह.मु.धुळे) या विद्यार्थ्याने आसोदा शिवारातील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण वाडीले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत तरूणाचा मृतदेह झाडावरुन खाली उतरविला. दरम्यान, घटनास्थळाची हद्द तालुका पोलीस ठाण्याची असल्याने ते देखील घटनास्थळी पोहचले होते. यावेळी तरूणाची अंगझडती घेतली असता त्यात आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच मोबाईल पोलिसांना आढळले. त्यावरून तरूण हा प्रदिप कोळी असल्याची ओळख पटली़ मोबाईलमधील क्रमांकांवर संपर्क साधून प्रदीपचा मावसभाऊ कमलेश यास पोलिसांनी घटनेबाबत कळविले़दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रदीप याने आत्महत्या कशासाठी केली, त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जळगावकडे धाव घेतली होती.
जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची शेतात गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:02 PM
अभियांत्रिकीचा पेपर देण्यासाठी घरातून निघालेल्या प्रदीप समाधान कोळी ( २७, रा.सुकळी, ता.मुक्ताईनगर, ह.मु.धुळे) या विद्यार्थ्याने आसोदा शिवारातील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी १० वाजता उघडकीस आली.
ठळक मुद्देआधारकार्ड व मोबाईल वरून पटली ओळखआत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद