अमळनेर : तालुक्यातील खर्दे येथील २६ वर्षीय तरुणाने घराशेजारी असणाºया विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. तर निमझरी येथील १५ वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजता घडली.संदीपच्या वडिलांवर ५० हजार विकास सोसायटीचे व खाजगी एक लाख कर्ज होते. पीक कर्ज व खासगी उचल फेडणे शक्य नव्हते. संदीपने जळगाव येथे नुकताच आयटीआयला प्रवेश घेतला होता. परंतु फी पूर्ण भरू न शकल्याने फी कोणाकडून तरी जमा करण्यासाठी तो घरी आल्याचे सांगण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.निमझरी येथील प्रणव उर्फ राज शंकर पाटील (वय १५) हा मुलगा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दहिवद शिवारालगतच्या दीपक सेठ यांच्या शेतातील शेततळ्यात बुडल्याची माहिती त्याच्या सोबतच्या मुलाने दिली. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाला होता. तो बैल ांना पाणी पाजायला गेला असता त्याचा पाय घसरल्याचे गावकºयांनी सांगितले. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंदकेली आहे.
एका तरुणाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तळ््यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 8:37 PM