जळगाव : दुचाकी चालवत असताना साईड देण्याच्या कारणावरुन सहायक फौजदाराच्या मुलासह दोघांनी प}ी-प}ीला बेदम मारहाण करुन ख्वॉजामिया दर्गा परिसरातील दुकानातील साहित्याची नासधूस केली. पोटात लाथा मारल्यामुळे महिलेला प्रचंड वेदना झाल्याने तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणारे क्षीतिज अशोक विसपुते (रा.अयोध्या नगर) व नीलेश संजय साळवे (रा.पोलीस लाईन, जळगाव) दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साळवे हा सहायक फौजदाराचा तर विसपुते हा न्यायालयातील निवृत्त अधीक्षकाचा मुलगा आहे. दरम्यान, ही घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ख्वॉजामिया दर्गाजवळ घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजीत विठ्ठल इंगळे (रा.दांडेकर नगर,) हे बहिण मंजुषा यांच्यासोबत दुकानात जात असताना क्षीतिज अशोक विसपुते हा त्याच्या मैत्रीणीसोबत दुचाकीने इंगळे यांच्यापुढे चालत होता. इंगळे यांनी त्याला हॉर्न वाजवून साईड देण्याचा इशारा केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर इंगळे यांनी पुढे गेल्यावर त्याला जाब विचारला. त्यात दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर इंगळे हे त्यांच्या संगणकाच्या दुकानात गेले. विसपुते याने सोबतच्या मैत्रीणीला सोडून इंगळे यांचे दुकान गाठले. मुलीसोबत असल्यामुळे तु जास्त आवाज करत होता का? असे म्हणत इंगळे यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर विसपुते हा साळवे याला सोबत घेवून आला. त्यानेही या दोघांना मारहाण केली.अदखपात्र गुन्ह्याची नोंदमारहाण करणा:या तरुणाच्या शोधासाठी पोलीस निघत असताच ते दोघं तरुणही पोलीस स्टेशनला आले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकिय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी दिली. दरम्यान, पोलिसाचा मुलगा असल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला नाही असा आरोप इंगळे यांनी केला.वाद सोडविण्यासाठी आलेल्या प}ीला मारविसपुते व साळवे हे दोघं जण पतीला मारहाण करत असल्याचे पाहून इंगळे यांची प}ी पूनम या दुकानातून बाहेर आल्या. दोघांना आवरत असताना त्यांनी पूनम यांच्या पोटात लाथा मारल्या. यानंतर मारहाण करणारे तेथून निघून गेले. इंगळे यांनी प}ी व बहिणीला घेवून जिल्हा पेठ पोलीस गाठले. पोटात प्रचंड वेदना होत असल्याने पूनम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसाच्या मुलासह दोघांकडून मारहाण
By admin | Published: January 15, 2017 12:34 AM