यावल : तालुक्यातील नायगाव येथे एका १६ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी सायंकाळी घडली. सुजल रमण तडवी असे या मुलाचे नाव आहे.
आपल्या गुरांच्या गोठ्यात पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी यांनी दिल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. मयत सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुजलने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.