ऑनलाईन लोकमतचुंचाळे, जि. जळगाव, दि. 10 - यावल तालुक्यातील बोराळे येथील तुळशीराम शिवराम पाटील (वय 85) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ आहे. ही घटना शनिवार, 10 रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आत्महत्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सततची नापिकी व शेती मालाला चांगला भाव न मिळणे, उत्पादनापेक्षा खर्च जास्त लागणे, शेतातील माल विकूण हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली़ आहे. बोराळे, ता.यावल येथील रहिवासी तुळशीराम पाटील यांच्याकडे दोन एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते व आपण आत्महत्या करू, असे ते नेहमीच सांगायचे. शुक्रवारी रात्री ते गावातील मंदिरात झोपले होते तेथून त्यांच्या मुलाने त्यांना घरी नेले व पहाटे त्यांचा मुलगा साडेपाच वाजेच्या सुमारास प्रात:विधीसाठी बाहेर पडल्यानंतर तुळशीराम पाटील यांनी राहत्या घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतला़.
या प्रकरणी पोलीस पाटील माधुरी राजपूत यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ तसंच त्यांचंपाच तास शवविच्छेदन रखडले.शनिवारी सकाळी नऊ वाजता ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतरही डॉक्टरांअभावी तब्बल पाच शवविच्छेदन रखडल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला़ प्रभारी डॉ.देवश्री घोषाल यांनी पदभार सोडल्याने मृतदेह पाच तास येथे विच्छेदनाकरीता पडून होता़ दुपारी दोन वाजता हिंगोणा आरोग्य केंद्राचे डॉ. फिरोज तडवी आल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केले.