ऑनलाईन लोकमत एरंडोल , दि.5 : येथील बालाजी मढी परिसरातील रहिवासी विवाहिता शीतल नरेंद्र महाजन (27) हिने मुलगा तेजस (7) तसेच अवघ्या 14 महिन्याची मुलगी साधना यांच्यासह झानपुरी शिवारातील आपल्या सास:याच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस सूत्रानुसार, एरंडोल तालुक्यातील तळईचे माहेर असलेल्या शीतल हिचा विवाह मार्च 2009 मध्ये एरंडोल येथील नरेंद्र रामलाल महाजन याच्याशी झाला. दरम्यानच्या काळात त्यांच्या संसारवेलीवर मुलगा तेजस व साधना नामक मुलगी अशी दोन फुले उमलली होती. दरम्यान, गेल्या मंगळवारी रात्री उशिरा शीतलने एरंडोल पोलीस स्टेशनला आपल्याला मारहाण व धमकी दिल्याची तक्रार केली होती. यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शीतल ही आपल्या दोन्ही अपत्यांना घेवून शेतात गेली आणि तिने तेथील विहिरीत मुलांसह उडी मारली. त्यामुळे तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी या घटनेचा उलगडा होवून पोलिसांनी विहिरीतील तिघांचे मृतदेह बाहेर काढले व विच्छेदनासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, या घटनेची खबर मिळताच शीतलच्या आई, वडील व आप्तेष्टांनी एरंडोल पोलीस स्टेशनला धाव घेऊन पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
दोन अपत्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 7:01 PM
एरंडोल येथील घटना : विवाहितेने मृत्यूपूर्वी पोलिसात मारहाणीची दिली होती तक्रार
ठळक मुद्देसास:याच्या शेतात केली विवाहितेने आत्महत्याआत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट नाहीविवाहितेच्या माता- पित्यांची सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी