जळगाव : शहरातील मेहरुण शिवारात एका शेतात कुणाल मैकूलाल पाली (वय 28 रा. यवतमाळ ह.मु. मेहरुण)या तरुणाने झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मेहरुणमधील शेतकरी विशाल नामदेव नाईक यांच्या शेतात वाचमन म्हणून कुणाल काम करीत होता. मुळचे यवतमाळ येथील असलेले पाली कुटुंब अनेक दिवसापासून रोजगारानिमित्त जळगावात स्थायिक झाले होते.वडील मैथुलाल छोटूलाल पाली, आई रेखा व भाऊ सुनील यांच्यासह वास्तव्याला होता घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन शेतमालक नाईक यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिकारी नीता भोळे यांनी कुणाला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे विशाल हा अविवाहित होता. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड करीत आहे.
जळगाव शहरात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:29 PM