जळगाव : शंकराप्पा नगरातील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयानजीक वास्तव्याला असलेल्या गणेश दिलीप जावळे (३३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
दरम्यान, गणेश याने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नाही; मात्र याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून गणेशच्या नातेवाइकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेथे दोन तास तेथे गोंधळ चालला. शेवटी शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या अहवालावरून गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर वाद निवडला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश अविवाहित होता. आई व तो एमआयडीसीत कंपनीत कामाला होता.