पारोळा :घरची परिस्थिती हालाखीची, त्यातच पतीला असलेले दारूचे व्यसन, पती-पत्नीचे वारंवार उडणारे खटके आदी कारणावरून सरला कोळी त्रस्त होती. आपल्या पश्चात मुलांची आबाळ नको म्हणून तिने स्वत:सह आत्महत्या करीत, आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे तामसवाडी गाव सुन्न झाले.सरला कोळी पतीसह माहेरीच मात्र वेगळ्या भागात राहत होती. त्यांच्या घराची परिस्थिती हालाखीची होती. दोन्हीजण मोलमजुरी करूनच संसाराचा गाडा हाकीत होते. त्यांनी न्यू प्लॉट भागात पत्री शेड बांधले होते. कष्ट करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने, नैराश्यातून सुभाष कोळीला दारूचे व्यसन जडले होते. यामुळेच पती-पत्नीत वाद उडत होते. सरलाचे आई-वडील गावातच राहत होते. मुलांसाठी तुला जगावे लागेल असा धीर ते मुलीला देत होते. मात्र दिवसेंदिवस तिला सर्व असह्य होऊ लागले. जीवन जगून उपयोग नाही अशा विचारापर्यंत ती आली.दीड वर्षाच्या कृष्णाला कवेत घेत ती दोघ मुलींसह शेतशिवारात गेली. वसंत पाटील यांच्या शेतातील विहिरीत एकेका मुलाला टाकीत स्वत:ही विहीरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली.सालदाराच्या लक्षात आली घटनावसंत पाटील यांचा सालदार पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेला. त्याला विहिरीतील पाण्यात मुलांचे मृतदेह तरंगतांना दिसले.अरूण पुंजू पवार, गिरीश पवार, अनिल पवार, दासू जगन्नाथ पाटील, रामभाऊ पवार, सुनील बिरारी यांनी मृतदेह बाहेर काढले. दरम्यान महिलेचा मृतदेह खाली रूतल्याने, दीड तासांच्या प्रयत्नानंतर तो काढण्यात आला.माता-पित्यांचा आक्रोशदरम्यान मुलीने नातवांसह आत्महत्या केल्याचे समजताच, सरला कोळी हिच्या माता-पित्याने एकच आक्रोश केला होता. (वार्ताहर)
परिस्थितीला कंटाळून आत्महत्या
By admin | Published: February 22, 2017 12:17 AM