जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील योगेश अजारिया पावरा (२५, रा. रोषमाळ बुद्रुक, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या आदिवासी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने हा विद्यार्थी चिंतेत होता, अशी माहिती मिळाली.रात्रीपासून या विद्यार्थ्याचा मृतदेह घटनास्थळी पडून असल्याने वसतिगृहातील सहविद्यार्थी संतप्त झाले होते. रात्री वसतिगृहाची सुरक्षादेखील रामभरोसे असल्याने प्रशासन करते तरी काय असा सवाल उपस्थित करण्यात आला. एमएसडब्लूच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पावरा याच्या मृत्यूनंतर अधीक्षक जागेवर नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन केले. घटनास्थळी पाळधी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून तणावाचे वातावरण आहे.आम्ही येत नाही तो पर्यंत मृतदेह उचलू नका, असा निरोप योगेशच्या आई-वडीलांकडून आल्याने दुपारी पाऊण वाजेपर्यंत मृतदेह जागेवरच पडून होता.
बांभोरी येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:50 PM
जळगाव जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्देशासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने होता चिंतेतदुपारी पाऊण वाजेपर्यंत मृतदेह जागेवरच