जळगाव : कर्जाचा वाढता डोंगर व त्याच कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने श्यामकांत विनायक सूर्यवंशी (वय ३७, रा. आमोदा बु, ता.जळगाव) तरुण शेतक-याने विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्यामकांत सूर्यवंशी यांच्याकडे साडे तीन एकर शेती आहे. त्यांनी विविध कार्यकारी सोसायटी व आणखी एका संस्थेकडून अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याशिवाय खासगीही कर्ज घेतले होते. अल्प शेती, त्यात आलेल्या उत्पन्नात खर्चही निघत नाही. सतत दुष्काळाची छाया. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्या यादीत सूर्यवंशीचे नावच नाही आले, त्यामुळे त्याचाही लाभ मिळाला नाही. कर्जामुळे व्याजाचाही आकडा वाढत चालला. या साºया नैराश्यातून श्यामकांत सूर्यवंशी यांनी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी शेतातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला.श्यामकांत यांच्या पश्चात आई कलाबाई, वडील विनायक ओंकार सूर्यवंशी, पत्नी मीना, एक मुलगा, एक मुलगी व सुधाकर, रवींद्र व प्रकाश असे तीन भाऊ आहेत.
कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने तरुण शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:19 AM
कर्जाचा वाढता डोंगर व त्याच कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने श्यामकांत विनायक सूर्यवंशी (वय ३७, रा. आमोदा बु, ता.जळगाव) तरुण शेतक-याने विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देआमोदा बु: येथील घटना तीन दिवस मृत्यूशी झुंज