जामनेर : मांडवे खुर्द, ता.जामनेर येथील अंध विद्यार्थी अनवर तडवी याचे ऑनलाईन शिक्षण स्मार्ट फोनअभावी थांबल्याची बातमी लोकमतने गुरुवारी प्रसिध्द केली होती. सामाजिक दायित्वाची जाणीव असलेल्या जामनेर येथील सुमनबाई भिकू पाटील यांनी अनवरच्या घरी जाऊन त्याला मोबाईल भेट दिला.अनवर हा मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे त्याला घरुनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार होते. घरची गरीबीची परिस्थिती असल्याने तो महागडा स्मार्ट फोन घेत नसल्याने त्याची आपबीती लोकमतने समाजासमोर ठेऊन मदतीचे आवाहन केले होते.बातमी पाहून नागदेवता भोजनालयाचे किशोर पाटील यांनी आई भिकुबाई यांना सांगताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मिळणाऱ्या पेन्शनमधून मुलगा (स्व) दिनेश याच्या स्मरणार्थ अनवर यास मोबाईल भेट दिला. मोबाईल हातात पडताच अनवर व त्याच्या पालकांना गहिवरुन आले. ऑनलाईन शिक्षणातील अडसर दूर झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. लोकमतने दखल घेत केलेल्या आवाहनामुळेच हे शक्य झाल्याचे त्याने सांगितले.
संडे हटके बातमी : मांडवे खुर्दच्या अनवरला मिळाला स्मार्ट फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:34 PM
सामाजिक दायित्वाची जाणीव असलेल्या जामनेर येथील सुमनबाई भिकू पाटील यांनी अनवरच्या घरी जाऊन त्याला मोबाईल भेट दिला.
ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा जामनेर येथील महिलेचे दातृत्वआवाहनास दिला प्रतिसाद