यात रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून पुढील उपचारासाठी शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तरी, मतदारसंघातील जास्तीतजास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येणार असून यात डॉ. निलेश चांडक (कॅन्सरतज्ज्ञ), डॉ. श्रद्धा चांडक (कॅन्सरतज्ज्ञ), डॉ. भूषण पाटील (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. यू.बी. ताडखेडकर (नेत्रशल्यचिकित्सक तज्ज्ञ), डॉ. प्रवीण पाटील (नेत्रशल्यचिकित्सक तज्ज्ञ), डॉ. कुरकुरे (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. सचिन अहिरे (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. संदीप जोशी (हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. विक्रांत पाटील (हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. बान्सी (त्वचारोगतज्ज्ञ), डॉ. जी.एम. पाटील (बालरोगतज्ज्ञ), डॉ. आशिष पाटील (बालरोगतज्ज्ञ), डॉ. शरद पाटील (जनरल सर्जन), डॉ. प्रियंका पाटील (क्ष-किरणतज्ज्ञ), डॉ. सुमित पाटील (दंतशल्यचिकित्सक), तसेच
आयुष विभागातील डॉ. परेश पवार, डॉ. शिरीन बागवान, डॉ. तनुश्री फडके, डॉ. गणेश पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे शिबिर होत आहे.