शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पाचोऱ्यात ‘कोरोना’ युध्दात पोलिसांसोबत ‘सुपर ६२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 6:05 PM

‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत.

ठळक मुद्देमाजी सैनिकांचे प्रेरणादायी योगदानस्वेच्छेने मदतीची तयारी

महेश कौडिण्यपाचोरा, जि.जळगाव : जगभरात हजारोंचे प्राण घेणाºया ‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत.पाचोरा प्रशासकीय विभाग, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन अहोरात्र कोरोना विरोधात लढा देण्यासाठी संघर्ष करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने सुरू झालेले लॉकडाऊन पाचोरा शहरात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असून पोलिस आणि प्रशासनाला माजी सैनिकांची चांगलीच साथ लाभलेली आहे.प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची मागील महिन्यात माजी सैनिक संघ पाचोरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्वेच्छेने मदतीची तयारी दर्शवली. त्यावेळी पाचोरा माजी सैनिक संघाचे अध्यक्ष निवृत्त हवालदार बाळू पाटील यांनी माजी सैनिक कार्यालय जळगाव येथील अधिकारी सुभेदार मेजर वाकडे यांचेशी चर्चा करून देशसेवेसाठी या ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईत सहभागाची माजी सैनिक संघाची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आणि त्यांना सैनिक कार्यालयाकडून देखील तात्काळ मान्यता मिळाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा माजी सैनिक संघाची बैठक झाली आणि कोरोना विरुद्धच्या युद्धात माजी सैनिकांनी उडी घेतली.पाचोरा शहरातील भारत डेअरी स्टॉप, जारगाव चौफुली, राजे संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॉलेज चौक अशा प्रत्येक चौकात सकाळी सात ते एक आणि दुपारी चार ते आठ अशा वेळेत प्रत्येक ठिकाणी सहा माजी सैनिक पोलीस प्रशासनासोबत खंबीरपणे उभे राहून नियमभंग करणाºया आणि मास्क न वापरणाºया नागरिकांना समजावून सांगत आहेत तर कधीतरी कठोर भूमिका देखील घेताना दिसून येत आहेत. याशिवाय पाचोरा शहरातील पेट्रोल पंप, धान्य मार्केट आणि राणीचे बांबरुड, नांद्रा,शिंदाड यासारख्या खेड्यांवरदेखील दोन दोन माजी सैनिक नागरिकांमध्ये कोरोना जागृतीचे धडे देण्याचा प्रयत्न करीत आहेत.ही सेवा पूर्णपणे नि:स्वार्थ असून देशाला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी सैनिक नेहमीच पुढे असतो हे दाखवणारे हे चित्र अनेकांना प्रोत्साहित करून जाते. पाचोरा शहराच्या मुख्य रस्त्यांवर बाळू पाटील, समाधान पाटील, भगवान पाटील, दीपक पाटील, दीपक सांगळे ,सौमित्र पाटील, रावसाहेब पाटील, श्यामसिंग राजपूत, शांताराम शिंदे, संतोष मोरे, गणेश साळुंखे, हेमंत जोशी यांच्यासह ६२ माजी सैनिक उभे असून पूर्वी देशाच्या सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत होतो आता गावाच्या सीमेवर उभे राहून गावाचे रक्षण करीत आहोत हे अभिमानाने सांगतात त्यावेळी कोरोना पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही ही भावना अनेकांच्या मनात निर्माण होते.माजी सैनिकांनी स्वत: पुढे येऊन या राष्ट्रीय संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आणि योगदान देण्यासाठी तयारी दर्शवली. आज पोलिस आणि प्रशासनाला त्यांची चांगलीच मदत होत असून ते आधी देशाची बाह्य सुरक्षिततेचे रक्षण करत होते आज ते देशाची अंतर्गत सुरक्षितता तेवढ्याच प्रामाणिकपणे करीत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.-अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक, पाचोरासीमेवर लढताना शत्रू कोण हे दिसत होते आणि कळतदेखील होते परंतु या संकटाच्या वेळी अदृश्य शत्रू असल्याने हा लढा खूप वेगळा असून नागरिकांनी जागृत होणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे अधिक गरजेचे आहे.-बाळू पाटील, अध्यक्ष, माजी सैनिक संघ, पाचोरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPachoraपाचोरा