उत्तम काळेभुसावळ : शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणीपुरवठा योजनेला तब्बल ६२ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन जीर्ण झाली आहे. पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर पाणी शुद्ध करण्यास अडचणी येत असल्यामुळे शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, अमृत योजनेचे काम सुरू असून हे कामही ६५ टक्के झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.भुसावळ शहरात तापी नदी पाणीपुरवठ्यासाठी वरदान आहे. मात्र शहराला पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना ही १९५८ आणि १९८४ अशी दोन राबविण्यात आली आहे.वाढीव पाईपलाईनशहरांना त्यावेळी व त्यानंतर वाढीव अशी १५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तब्बल ६२ वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावेळी तीन इंच ते पाचशे एम.एम.पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तर त्यावेळी यावल रोडवरच जल शुद्धीकरण केंद्रही बांधण्यात आले आहे.अद्यापही सिमेंटचे पाईप कायमशहरात त्याकाळी सिमेंटच्या पाईपांचा वापर करण्यात आला. बºयाच भागातून ते पाईप काढून त्या ठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बºयाच ठिकाणी सिमेंटचे पाईप कायम असल्याचेही सांगण्यात आले.अमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटरशहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम जवळपास ६५ टक्के झाले आहे. या योजनेत तब्बल २१३ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आले आहे. तर अजून काही परिसरांमध्ये पाईप लाईन वाढवण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीनशे किलोमीटरपर्यंत पाईपलाईन राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र असून या केंद्राची क्षमता ४८ एम.एल.डी. आहे. या फिल्टर प्लांटमध्ये तापी नदीवरून पाणी आणण्यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्यात येत आहे.या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २२ एम.एल.डी. आहे. मात्र सध्या या जलशुद्धीकरण केंद्रातून सतरा ते अठरा एम.एल.डी. पाणी शुद्ध होत आहे. त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर मात्र ३० ते ४० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर जातो, तर जामनेर रोड परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.
भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 7:37 PM
शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला होताहेत ६२ वर्षेअमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटर