जळगाव : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सरसावली असून देशभरातील सर्व शाखांसह जळगावातूनही रोख मदत देण्यात आली. औषधी व इतर साहित्याचा साठा असल्याने जमा झालेल्या रकमेतून आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी सांगितले.केरळ येथे पूरस्थिती गंभीर झाल्याने देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये आयएमएचाही मोठा वाटा आहे. यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी पुढाकार घेत अमरावती येथे झालेल्या बैठकीत आयएमएच्या सर्व शाखांना मदतीचे आवाहन केले आहे.एक करोडहून अधिक रक्कम जमाडॉ.रवी वानखेडकर यांनी आवाहन करताच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखांनी एक करोडपेक्षा जास्त निधी उभारला आहे. यामध्ये जळगाव आयएमएने पन्नास हजार रुपयांचा निधी तत्काळ पाठविला.जळगावातून निधी जमा करण्यासाठी जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, सचिव डॉ.विलास भोळे, उपाध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, कोषाध्यक्ष डॉ. तुषार बेंडाळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यानुसार तत्काळ निधी जमा होऊन तो राष्ट्रीय पातळीवर संघटनेकडे सुपूर्द करण्यात आला.
आयएमएकडून केरळच्या पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 4:43 PM
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सरसावली असून देशभरातील सर्व शाखांसह जळगावातूनही रोख मदत देण्यात आली.
ठळक मुद्देरोख रक्कम जमा करून खरेदी करणार आवश्यक साहित्यकेरळ येथे पूरस्थिती गंभीर झाल्याने देशभरातून मदतीचा ओघ सुरूएक कोटीहून अधिक रक्कम जमा