शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरज झंवरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:16 AM

जळगाव - बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर याला शुक्रवारी सायंकाळी मू.जे. ...

जळगाव - बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर याला शुक्रवारी सायंकाळी मू.जे. महाविद्यालय परिसरातील निवासस्थानातून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर हे पथक लागलीच पुण्यासाठी रवाना झाले होते. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

एक ते दीड महिन्यांपूर्वी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरात धाडी टाकल्या होत्या. यावेळी सुनील झंवर तसेच बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेतून दोन ट्रक भरून संगणक, कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याच कागदपत्रांच्या आधारावर बीएचआरच्या घोटाळ्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची दोन-तीन पथके राज्यभर त्याचा शोध घेत आहे. दुसरीकडे शुक्रवारी पुण्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच़ एम़ नन्नवरे यांचे पथक जळगाव शहरात दाखल झाले होते. त्यांनी सायंकाळी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला त्याच्या निवासस्थानातून अटक केली आहे.यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

ताब्यात घेतल्याची नोंद...

सहायक पोलीस निरीक्षक एच.एम.नन्नवरे यांच्या पथकाने सूरज झंवर याला ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तेथे त्यास ताब्यात घेतल्याची नोंद घेतली. शेवटी आर्थिक गुन्हा शाखेचे पथक लागलीच पुण्याच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, तपासकामी अधूनमधून हे पथक जळगावात ये-जा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

झंवरच्या अडचणीत वाढ

नाशिकमधील मांडसांगवी येथील १०० कोटीची जमीन मुख्य संशयित सुनील झंवरने अवघ्या तीन कोटीत घेतली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश दिले होते. त्यानंतर आता अपर महसूल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे झंवरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

महावीर जैनचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे येथील 'बीएचआर'च्या घोले रोड शाखेत रंजना घोरपडे यांची १९ लाख ९ हजार ८६० रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजित वाणी व कमलाकर कोळी या पाच जणांना २७ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यातील कोळी हा जामिनावर आहे. आता सीए महावीर जैन याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज होऊन न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अन्य संशयित विवेक ठाकरे, धरम साखला, सुजित वाणी यांच्या जामीन अर्जावर बुधवार, २७ रोजी सुनावणी होणार आहे.