भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागातील भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वेलाईन अंथरण्याचे तसेच तांत्रिक कामासाठी रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या सोमवारपासून पूर्ववत धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.भुसावळ विभागातील भादली येथे रेल्वे यार्डातील तिसऱ्या लाईनच्या जोडणीचे काम ६ सप्टेंबरपासून सुरू होते. यामुळे भुसावळवरून सोडण्यात येणाºया पाच पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.तिसरी रेल्वे लाईन जोडणीचे व यार्डातील काम करण्यात आल्यानंतर आता रद्द करण्यात आलेल्या सुरत, मुंबई व देवळाली पॅसेंजर पूर्ववत निर्धारित वेळेनुसार सोमवारपासून धावणार आहेत.अन्य मार्गाने वळविण्यात आलेले व मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्याही आता निर्धारित मार्गावरूनच धावणार आहते.ब्लॉकदरम्यान सिग्नल मेेंटेनन्सचे कार्यभादली ब्लॉकमुळे खंडवा मार्गावरील तसेच अकोला मार्गावरील सिग्नल मेंटेनन्सचे कार्यही या दरम्यान करण्यात आले. यामुळे चेन्नई-जोधपूर, गीतांजली, प्रेरणा एक्सप्रेससह पाच ते सहा गाड्या एक ते दीड तासाच्या उशिराने धावल्या.
सुरत-मुंबई व देवळाली पॅसेंजर आजपासून पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:44 AM
प्रवाशांना मिळणार दिलासा
ठळक मुद्दे प्रवाशांचे होणारे हाल थांबणारगरिबांची जादा भाड्यापासून होणार सुटकासर्व गाड्याही होणार आता सुरळीत