ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.7 - रेल्वे -प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव दरम्यान, दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर यार्ड रिमोल्डींग करण्याचे काम करण्यासाठी 9 जुलै रोजी पहाटे 4 ते दुपारी 12 वाजे र्पयत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणारी 59013 सुरत-भुसावळ गाडी आणि 59076 सुरत-भुसावळ पँसेजर या दोन्ही गाडय़ा रद्द करण्या आल्या आहेत.
दरम्यान, 12656 नवजीवन एक्स्प्रेस दीड व 12833 अहमदाबाद-हावडा दोन तास उशीराने धावतील, प्रवाशांनी नोंद घ्यावी,असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.