जळगाव - नावातच सुंदर असलेल्या सुंदरपट्टी या गावाने स्वच्छतेतही सुंदर प्रगती साधली आहे़ गावात असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, व्यायाम शाळा, मंदिरे या वास्तुंची नियमित स्वच्छता केली जाते़ गाव शंभर टक्के हगणदारी मुक्त आहे़ गावात कुटुूंब संख्या १७० असून प्रत्येक कुटूंबासाठी एक स्वतंत्र शौचालय आहे़ संपूर्ण गावात भुयारी गटारींची व्यवस्था करण्यात आली़ सांडपाणी एकत्र करून त्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी केला जातो़ गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांना स्वच्छता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 4:27 PM