शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप

By विलास बारी | Published: May 11, 2024 11:15 PM

मी कुणाच्या दबावात येत नाही: सुरेशदादा.

जळगाव: ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी दबावाखाली जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला; परंतु आपण कोणाच्या दबावात येणारे नसून, राज्य आणि जळगाव शहराच्या विकासासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचे, सुरेशदादा जैन यांनी `लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनीही सुरेशदादा जैन हे कोणाच्या दबावात येणारे व्यक्तिमत्व नसल्याची प्रतिक्रिया, सावंत यांच्या दाव्याचा प्रतिवाद करताना व्यक्त केली.   

गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाच्या सुरेशदादांसोबतच्या भेटीनंतर दोन तासांतच, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरेशदादांवर दबाव टाकून त्यांच्याकडून `स्क्रिप्ट’ वाचून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेशदादांनी मतदानाच्या तोंडावर उद्धवसेनेचा दिलेला राजीनामा,  भाजपला पाठिंब्याबाबत त्यांना वाचायला दिलेली `स्क्रिप्ट’, हे प्रकार भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याकडे निर्देश करणारे आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांनी दबाव टाकून सुरेशदादांना हे प्रकार करायला लावले, असा थेट आरोप संजय सावंत यांनी केला.

विकासासाठी भाजपसोबत: सुरेशदादा

सावंत यांच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी `लोकमत’ने सुरेशदादा जैन यांच्याशी संपर्क केला असता, आपण कुणाच्या दबावात येणारे नसून देश, राज्य आणि जळगाव शहराच्या विकासासाठी भाजपला समर्थन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याची स्थिती पाहता, विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, असे ते म्हणाले. गिरीश महाजन यांच्यासोबत आपली १९९२ पासून मैत्री आहे. त्यावेळी निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या विरोधात ईश्वरलाल जैन उभे होते. त्यावेळीदेखील आम्ही गिरीश महाजन यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे संजय सावंत यांच्या आरोपात काही तथ्य नाही, अशी पुस्तीही सुरेशदादांनी जोडली.

सुरेशदादा कोणत्याच दबावापुढे झुकणारे व्यक्तिमत्त्व नाही. दबाव, घाबरले, हे शब्द दादांना लागू पडत नाहीत. मोदी जगमान्य नेतृत्व आहे, म्हणून त्यांनी आम्हाला समर्थन, आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आमची ताकद नक्कीच वाढली आहे. मागील निवडणुकीतही दादा सोबतच होते.

- गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री 

टॅग्स :Jalgaonजळगाव