सुनील पाटील ।जळगाव : कारागृहातून बंदी पलायन, गांजा, दारु व मांसाहार आतमध्ये जाणे यासारखे प्रकार कारागृहासाठी नवीन नाहीत, मात्र दोन दिवसापूर्वी घडलेली घटना म्हणजे थेट गावठी पिस्तुल लावून बंद्यांचे पलायन म्हणजे कारागृहाचा अतिशय भोंगळ व गलथान कारभाराचा हा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. एक नव्हे, तीन गावठी पिस्तुल व त्यानंतर पोळीतून जीवंत काडतूस आतमध्ये गेल्याने सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघालेले आहेत. बंद्यांनी पलायन केल्यानंतर कारागृहाची तोडलेल्या भींतीचे बांधकाम सुरु करण्यात आले. हा प्रकार म्हणजे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार’ असाच आहे.‘लोकमत’ ने कारागृहातील उणिवांची सत्यता पडताळणी केली असता अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी कारागृह परिसरात भेट देऊन पाहणी केली असता गणेश नगराकडून कारागृहाची भींत उंच असली तरी रहिवाशी वस्ती व भींत यांच्यात खूप अंतर आहे, शिवाय पावसाळ्याचे प्रचंड गवत झालेले असल्याने हा भाग निर्मनुष्य असतो. या जागेवरुन दिवसा सहज कोणीही कारागृहात वस्तू फेकू शकतो. येथे आलेल्या व्यक्तीला सहजासहजी कोणी हटकत नाही.गणेश नगर ते कोषागार कार्यालयाकडे असलेल्या या भींतीची उंची वाढविली जात आहे.कारागृहातील एक अधिकारी व एक कर्मचारी तेथे थांबून होते. दंगलग्रस्त कॉलनी व प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे असलेल्या जलस्वराज्य योजनेच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेच्या पाठीमागे कारागृहाची भींत असून तेथून देखील आतमध्ये वस्तू फेकणे सहज शक्य आहे. या भींतींच्या वर संरक्षक जाळी असणे आवश्यक आहे, मात्र येथे या जाळ्या नाहीत.कारागृह ते अमळनेर मोबाईल कनेक्शनकारागृहात असताना गौरव पाटील याने अमळनेरातील दोन तरुणांशी संपर्क साधला आहे. त्यानंतर जगदीश पाटील याच्याशीही त्याचे बोलणे झालेले आहे. मांसाहारी जेवण व फळे पाठविण्यापासून तर पिस्तुलातील काडतूस याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी होते व त्याची कारागृहातील कोणालाही माहिती मिळत नाही यावरुन सुरक्षा व्यवस्था कशी आहे हे लक्षात येते. सुरक्षा व्यवस्था चोख राहिली असती किंवा रोज बराकची तपासणी झाली असती तर गावठी पिस्तुल कारागृहातच सापडले असते व बंद्यांनी पलायन केल्याची घटना टाळता आली असती, मात्र कोरोनाच्या नावाने तपासणी करणे टाळण्यात आले.काय आहेत कारागृहात उणिवा-सराईत गुन्हेगारांना कार्यालयात शिपायाची कामे करायला लावणे-बराक व भींतीचे अंतर २५ मीटर असावे, प्रत्यक्षात ते १२ ते १५ मीटर आहे.-सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, त्यामुळे गैरकामांना चालना मिळते-कोरोनामुळे चार महिन्यापासून बराकची तपासणी नाही-बराकीजवळ सुरक्षा रक्षक नसणे-बंदींच्या तुलनेत मनुष्यबळाची कमतरता-गुन्हेगारी बंद्यांचे लाड पुरविणे-बंद्यांजवळ मोबाईल असणे
आश्चर्यम् ! तहान लागल्यावर विहिर खोदण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 1:10 PM