जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी विद्यापीठातील काही शिपाई, सफाई कर्मचारी अधिकारी व शिक्षक यांच्या घरी अनपेक्षित भेट देत सरप्राइज दिले. निमित्त होते दिवाळीचे. यावेळी कुलगुरूंनी कर्मचा-यांना मिठाई देऊन दिवाळी साजरी केली. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटूंबीयांचा आनंद द्विगुणित झाला होता.गतवषार्पासून कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील हा उपक्रम राबवित आहेत. विद्यापीठात काम करणा-या घटकांच्या कुटूंबीयांसमवेत काही क्षण घालून या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. कोणताही बडेजावपणा न करता अत्यंत साधेपणाने कुलगुरू कर्मचाºयांच्या घरी जाऊन कुटूंबीयांची विचारपूस करतात. हा साधेपणा पाहून सगळेच भारावून जातात व त्यांची दिवाळी अविस्मरणीय ठरते.१७ कर्मचा-यांच्या घरी भेटीविद्यापीठातील साफसफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिपाई, कुशल परिचर, सहायक, अधिकारी, शिक्षक अशा १७ जणांच्या घरी भेट देऊन प्रा.पाटील यांनी दीपावलीच्या शुभेच्छा व मिठाई दिली. या वेळी त्यांच्या सोबत सहायक गोकुळ पाटील होते. कुलगुरूंनी घरी जावून भेट दिली त्यामध्ये शिक्षक प्रा.भूषण चौधरी, मनोज पाटील,वंदना शिंदे, शारदा ठाकुर,अधिकारी हुसेन दाऊदी, जयश्री शिंगारे, अजमल जाधव, सहायक संजय महाजन, पुष्पा पाटील, स्वीय सहायक गुलाबराव बोरसे, कुशल परिचर समाधान पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक प्रमोद पाटील, शिपाई सुनील आढाव, दिलीप लोहार, सुरक्षा रक्षक दिलीप बोरसे, सफाई कर्मचारी प्रमोद शेट्टी यांचा समावेश आहे.
सरप्राइज ! कुलगुरूंची कर्मचाऱ्यांच्या घरी अनपेक्षित भेट ; मिठाई देऊन दिवाळी केली साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 5:29 PM