जळगाव : नातेवाईकांनी मृत घोषीत केलेल्या जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वर्धा येथून अटक केली व सायंकाळी जळगावला आणले. जावळे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना २००६ मध्ये एक महिन्याच्या पॅरोल रजेवर आला होता व तेव्हापासून फरार झालेला होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र जावळे हा पॅरोल रजा संपल्यानंतर कारागृहात परत न आल्याने नाशिक कारागृह प्रशासनाने भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून फरार व पाहिजे आरोपींना शोधण्याबाबत आदेश आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला फरार आरोपींची यादी देऊन त्यांना शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
आश्चर्य : मृत घोषीत केलेल्या आरोपीला जेव्हा पोलीस पकडतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 8:42 PM
नातेवाईकांनी मृत घोषीत केलेल्या जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वर्धा येथून अटक केली व सायंकाळी जळगावला आणले. जावळे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना २००६ मध्ये एक महिन्याच्या पॅरोल रजेवर आला होता व तेव्हापासून फरार झालेला होता.
ठळक मुद्देखुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना झाला होता फरारस्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली वर्धा येथून अटकनातेवाईक दिली होती मृत्यू झाल्याची माहिती