जळगाव- जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मद्यतस्करी प्रकरण चांगलेच भावले असून त्यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होताच शिरसाठ यांची पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी तडकाफडकी मुख्यालयात बदली केली आहे़ त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे़ या प्रकरणातील अन्य तीन कर्मचाºयांवर अद्याप कारवाई झालेली नाही.लॉकडाउनच्या काळात आऱ के ़ व्हाईन्स शॉपमधून होत असलेला मद्यतस्करीचा डाव काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला होता़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्या़ त्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे नाईक संजय जाधव, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन पाटील, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज सुरवाडे व तालुका पोलीस ठाण्यातील भारत पाटील यांचादेखील मद्यतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर चौघांविरूध्द गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मुख्यालयात जमा केले़ इतर कर्मचाºयांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही़ संपूर्ण चौकशीचा अहवाल आल्यानंतर पोलीस अधीक्षक कारवाईची पुढील दिशा ठरवतील, अशी शक्यता आहे.
मद्यतस्करी भोवली, पोलीस निरीक्षकांची मुख्यालयात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:52 AM