पहूर, ता. जामनेर - बंदुकिचा धाक दाखवून भरदिवसा सहा लाख तीस हजार रुपयांच्या लुटीच्या तपासासाठी पहूर पोलिसांचे दोन पथके तयार करून ते बाहेरगावी रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या लुटीसाठी सकाळपासून लुटारु पाळत ठेवून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.येथील अजिंठा ट्रेडर्स पंपाच्या कर्मचाऱ्यांना सोमवारी बंदुकिचा धाक दाखवून भरदिवसा सिनेस्टाईल पद्धतीने सहा लाख तीस हजार रुपये लाबंविल्याची घटना घडली होती. पंपाचे कर्मचारी संजय पारखे व समाधान कुभांर शनिवार व रविवारी असा दोन दिवसांचा सहा लाख तीस हजार भरणा बँँकेत भरण्यासाठी सोमवारी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास गेले. याचवेळेत जामनेरकडून तीन युवक दुचाकीवर याठिकाणी आले व त्यांनी कर्मचाºयांना पिस्तूलचा धाख दाखवून तोंडावर स्प्रे मारला व पैशाची बॅग घेऊन पोबारा केला.पाचोरा विभागाचे पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सोमवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रत्यक्षदर्शी व्यावसायिक ललित लोढा यांच्याकडून कातकडे यांनी माहिती जाणून घेतली. रक्कम लांबिवणाºयांच्या तपासासाठी पहूर पोलिसांचे दोन पथके नियुक्त करून रात्रीच रवाना झाले आहे. गुन्ह्याच्या रेकॉर्डरील गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात येत असून रात्रीच रेकॉर्ड वरील एका गुन्हेगारांची झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे. या तपास कामात स्थानिक गुन्हे शाखा पहूर पोलीसांना मदत करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.नवनियुक्त डीवायएसपींना दरोडे खोरांची सलामीपाचोरा विभागाचे पोलीस उप अधीक्षक केशव पातोंड यांची बदली झाल्याने ईश्वर कातकडे यांची नियुक्ती झाली. त्यांनी सोमवारीच पदाची सूत्रे हाती घेतली. श्रीगणेशा पहूर येथील धक्कादायक घटनेने होऊन एक प्रकारे कातकडे यांना आव्हान दिले आहे.अशी घडली घटनासोमवारी सकाळी साडेअकरा वाजता संबंधित तीन युवक काळ््या रंगाची रेसर बाईक घेऊन जामनेर रोडवरील एका पंक्चरच्या दुकानाजवळ बाभळीच्या झाडाखाली दबा धरून बसलेले होते. याठिकाणी घटनेची रेकी आखली. दुपारी पावणे तीन वाजता युनियन बँकेच्या समोर येऊन पंपाच्या कर्मचाºयांच्या जवळ गेले. दुचाकी वरून तीन युवकांपैकी एक युवक खाली उतरून पंपच्या कर्मचाºयांजवळून पैशाची बॅस हिसकावून घेतली. याचा प्रतिकार संजय पारखेंनी केला. मात्र दुचाकीवरील युवकांनी पुन्हा त्यांच्या हातातून ही बॅग हिसकावून घेतली. यादरम्यान लुटारूंनी पिस्तूल काढले व हवेत दोन फायर केल्या. यामुळे पंप कर्मचारी भयभीत झाले. त्या वेळी त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला आणि हातातली पैशांची बॅग पुन्हा हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. पहिली फायरींग झाल्यावर परीसरातील घटना समजली. काही नागरिक त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून संबंधित युवकांनी पिस्तूल दाखवत ‘पुढे आले तर खबरदार....’ असे मराठीमध्ये बोलत धमकी दिली. ही संपूर्ण घटना पहूर गावातील दोन युवकांनी प्रत्यक्ष पाहली असून सकाळी साडे अकरा वाजता शेंदुर्णी येथे जात असताना संबंधित लुटारुंना त्यांनी पाहिले होते. दुपारी शेंदुर्णी येथून येत असताना याच युवकांची पंप कर्मचाºयांशी होत असलेला थरार या दोघांनी पाहिला. नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महिन्यातील दुसरी घटनापहूर येथील सराफ व्यापारी व वाकोद येथील रहिवासी कमलेश छाजेड हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्यावर औरंगाबाद महामार्गावर प्राणघातक हल्ला करून नव्वद हजाराचे दागिने चोरून जबरी लूट मागील महिन्यात झाली होती. या घटनेचा तपास लागलेला नसताना पुन्हा ही मोठी घटना घडली. तसेच एक ते दीड वर्षापूर्वी ठाणे जिल्हा दुय्यम निबंधक दीपक पंढरीनाथ पाटील यांच्या घरावर पेठ गावात दरोडा पडला होता. यात लाखोंचे दागिने लंपास झाली आहे. याचाही तपास लालफितीत आहे. एकंदरीत या घटनांमुळे सुरक्षितता धोक्यात आली असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.दोन पोलीस पथके तपासासाठी रवाना करण्यात आली असून एलसीबीची मदत घेतली जात आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन तपास करण्यात येत आहे.- दिलीप शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पहूर
लुटीसाठी सकाळपासून पाळत ठेवून होते चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 5:19 PM