मुक्ताईनगर : तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण १ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ३१ डिसेंबरपर्यंत केले जाणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेची सुरवात पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद जंगले यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी गटविकास अधिकारी एस.बी मावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश पाटील, डॉ.घडेकर उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भाग मिळून १ लाख ६७ हजार ८०४ नागरिकांचे १४४ पथकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश बी.पाटील यांनी यावेळी दिली.यंदा कोरोना महामारीमुळे कुष्ठरोग व क्षयरोग यांचे नवीन रुग्ण निदानाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. त्या केसेस शोधून उपचारावर आणणे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षनाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या काळात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे.सर्वेक्षण मोहीम यशस्वीतेसाठी कुष्ठरोग तंत्रज्ञ अर्जुन काळे , क्षयरोग पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.घरोघरी येणाऱ्या आशा व स्वयंसेवकास सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांनी केले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 2:13 PM
मुक्ताईनगर : तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण १ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ३१ डिसेंबरपर्यंत केले जाणार आहे. या ...
ठळक मुद्दे१ लाख ६७ हजार ८०४ नागरिकांची होणार तपासणी३१ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण