शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जळगावात संततधारने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:50 AM

अनेकांचे संसार पाण्यात

ठळक मुद्देरस्त्यांची प्रचंड दुरवस्थाकचऱ्या साचल्याने आरोग्य धोक्यात

जळगाव : सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी भागासह नाल्यालगत असलेल्या परिसरात जवजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तांबापुरा भागात घरे गळत असल्याने अनेकांचे संसार पाण्यात आहे तर मेहरुणमधील रेणुकानगर, पिंप्राळा हुडकोत परिसरात घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या भागात तर रस्त्यांची चाळणी झाल्याने चालणे कठीण होत आहे. या सोबतच या सर्व भागांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरण्यासह डासांचा त्रास वाढल्याने आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शहरासह परिसरातील नशिराबाद, शिरसोली, दापोरा, म्हसावद परिसरातही झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.जोरदार पाऊस झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यालगत असलेल्या व झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे दरवर्षी प्रचंंड हाल होत असतात. त्याप्रमाणे यंदाही १६ रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा २० रोजी सुरू झालेल्या व मंगळवारी संध्याकाळपर्यंत सलग २४ तास सुरू असलेल्या पावसामुळे या भागांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रत्यक्ष त्या भागांमध्ये जाऊन पाहणी केली असता नागरिकांचे प्रचंड हाल होण्यासह आरोग्यासाठी धोकादायक असणारे चित्र दिसून आहे.तांबापु-यात घरांमध्ये पाणीतांबापुरा भागात अनेक झोपडी वजा घरे गळत असल्याचे दिसून आहे. यामुळे घरांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण संसारच पाण्यात आहे. घरे गळत असल्याने घरातील पाणी वारंवार बाहेर फेकावे लागत आहे. कोणी भांड्यांच्या सहाय्याने तर कोणी कपड्याने पाणी निपळून बाहेर काढत आहे. मात्र सलग सुरू असणाºया पावसामुळे खाली पाणी काढत नाही तोच पुन्हा छतातून पाणी गळणे सुरूच आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी पाणी फेकून-फेकून हैराण झाले आहे. या पाण्यामुळे घरातील भांडे, गॅस, अंधरुन यासह सर्व साहित्यदेखील पाण्यात आहे. इतकेच नव्हे स्वयंपाक करणेही कठीण होत असल्याने उपाशी राहण्याचीही वेळ येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. अनेक घरांमध्ये पाणी गळणाºया ठिकाणी भांडे लावले असून त्यात पाणी साचले की ते १०-१५ मिनिटांनी फेकत आहे.रात्र काढली जागून; अबालवृद्धांचे हालतांबापुरातील घरात पाणी असल्याने जमिनीवर असो की खाटेवर अंथरूण टाकता येत नाही. झोपायलाही जागा नाही. त्यामुळे सोमवारी रात्री अनेकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. यामध्ये लहान मुले व वृद्धांचे अधिक हाल होत असल्याचे येथे चित्र आहे.रेणुकानगरात घरांना पाण्याचा वेढामेहरुण परिसरातील रेणुकानगरात तर अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. बाहेर पाणीच-पाणीच असल्याने घराबाहेर जावे कसे असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. संपूर्ण घरच पाण्यात असल्याने घरांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. घराबाहेर जाताना एकमेकांचा आधार घेत मोठी कसरत करीत नागरिक येथून वापरत आहे. त्यात सरपटणाºया प्राण्यांची भीती मनात कायम असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या पाण्यामुळे रात्रंदिवस डासांचा त्रास होत आहे तर रात्री पाण्यातील बेडकांच्या आवाजामुळे झोपही लागत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या घरांसमोरच असलेल्या नाल्यालगत कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयामुळे वाढलेल्या डासांचाही त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शौचालयाजवळही साचले पाणीमेहरुण परिसरातीलच रेणुकानगर समोर असलेलेल्या नाल्या लगतच्या सार्वजनिक शौचायलयाजवळही पाणी साचले आहे. त्यामुळे नाल्याला पाणी वाढले की, शौचालयातदेखील जाणे बंद होते. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होतात.पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात कचराच कचरामेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यात प्लॅस्टिक कचरा अधिक असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात. हा कचरा काढला जात नसल्याने नाल्याचे पाणी रहिवाशी भागात शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. मनपा याकडे दुर्लक्ष करून दोन वर्षापूर्वी उद््भवलेली स्थिती पुन्हा निर्माण करीत आहे का असा सवालही येथील रहिवाशांनी उपस्थित केला.कचºयाच्या ढिगांमुळे माशा, डास, दुर्गंधीतांबापुरा, मेहरुण, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या सर्वच भागांंमध्ये जागोजागी कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयांवर डुकरांचीही संख्या मोठी असल्याचे पाहणी दरम्यान दिसून आहे. हा कचरा पाण्यामुळे कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोबतच कचºयामुळे डासांची उत्पत्ती होण्यासह माशांचीही संख्या वाढली आहे.अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यातमेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर असलेल्या मोकळ््या जागेत तर सर्वत्र चिखल झाला आहे. या सोबतच रस्त्यांवरदेखील जागोजागी चिखल असून कचºयांसह डुकरांच्या अंगावरील माशा, डास घरांपर्यंत पोहचत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले.रस्त्यांची चाळणीमेहरुण भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या सोबतच रामेश्वर कॉलनीमधील सप्तश्रृंगी नगरातील लाल बाग चौकात रस्त्यांची चाळणी झाली आहे. इतकेच नव्हे मेहरुणकडून रामेश्वर कॉलनीकडे जाणारा रस्ता, शिवाजी उद्यान ते रामेश्वर कॉलनी, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी या भागातही रस्त्यांची बिकट स्थिती आहे. इच्छादेवी चौक ते शिरसोली रस्त्यावरदेखील जागोजागी मोठे खड्डे पडलेले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयापासून शिरसोली रस्त्याकडे जाणाºया मार्गाचीही पावसामुळे दैना झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील खडी, डांबर उखडल्याने ते वाहन धारकांसाठी धोकेदायक ठरत आहे. अशीच स्थिती शहरातील इतर भागांमध्येही आहे.तीन-तीन महिने साचून राहते पाणीरेणुकानगरात घरांभोवती साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून ते किमान तीन महिने तरी तसेच राहते, असा अनुभव नागरिकांनी सांगितला. एवढ्या दिवस या रहिवशांना कसरत करीत येथून ये-जा करावी लागते.सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचेप्रचंडहालसुप्रीम कॉलनी परिसरातही रहिवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्य रस्ता बरा असला तरी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. लहान-लहान गल्ली-बोळांमध्ये झालेल्या चिखलामुळे पायी चालणे कठीण असून दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.या भागातही चिखलामुळे व साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढत आहे व कचºयामुळे दुर्गंधी पसरत आहे.अनेक झोपड्यांवर मेनकापडतांबापुरा, रामेश्वर कॉलनी, मेहरुण तसेच सुप्रीम कॉलनी या भागात असलेल्या झोपड्या तसेच फळ््यांच्या घरांना मेनकापड लावून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न रहिवाशी करीत आहे. असे असले तरी जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी गळतच असल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव