अमळनेर : तालुक्यातील लोण येथील एका शेतकऱ्याचा शेतात संशयित मृत्यू झाला असून नातेवाईकांनी ५ जणांवर संशय व्यक्त केल्याने सकाळपासून गोंधळ सुरू होता. सायंकाळी पोलीस अधिकारी महसूल अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
लोण येथील रवींद्र देवराम पाटील हे सकाळी चार वाजता शेतात पाणी भरायला मोटरसायकलवर गेले होते. सकाळी ९ वाजता ते शिवाजी हिरामण कोळी यांच्या शेतात नाल्याच्या काठावर मातीत पालथे पडलेले आढळून आले. त्यांच्या अंगावर किरकोळ खरचटल्याच्या जखमा आढळून आल्या. रवींद्र पाटील यांचा संशयित मृत्यू झाल्याने त्यांचा मुलगा मेघराज पाटील व नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला व आरोपी अटक करत नाहीत तोपर्यंत प्रेत उचलणार नाही अशी भूमिका घेऊन शेतात ठाण मांडले होते. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी राकेश जाधव , तहसीलदार मिलिंद वाघ , सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी भेट दिली. सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. अखेर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे राहुल फुला यांनी आश्वासन दिल्यानन्तर शव विच्छेदनासाठी अमळनेरला आणण्यात आले.
दरम्यान मेघराज याने मारवड पोलीस स्टेशनला खबर देताना त्यांच्या शेतातील वहिवाट बंडू शिवाजी पाटील यांनी बंद केल्याने त्या वादातून यशवन्त पाटील, विलास पाटील, सुभाष पाटील यांनी २० रोजी मारहाण केल्याचे म्हटले आहे. वडिलांच्या संशयित मृत्यूबाबत शेतमालक बंडू पाटील, यशवन्त बंडू पाटील, आंनदा शिवाजी पाटील, विलास गोरख पाटील, सुभाष गंगाराम पाटील यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. शेत वहिवाट संदर्भात तहसीलदार यांच्याकडे सुनावणी सुरू होती.
===Photopath===
080621\08jal_12_08062021_12.jpg~080621\08jal_13_08062021_12.jpg
===Caption===
लोण येथे शेतकऱ्यांचा संशयित मृत्यू~लोण येथे शेतकऱ्यांचा संशयित मृत्यू