जळगावात निवृत्त जमादाराच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: July 14, 2017 12:00 PM
आरोप प्रत्यारोपात एका खाजगी रुग्णालयात दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून गेली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - पती-प}ीत सतत होणा:या वादातून वैशाली संतोष गाढे (वय 29, रा. आदर्शनगर) या विवाहितेचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला. माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार तिला जाळण्यात आले आहे तर तिनेच स्वत:हून जाळून घेतल्याचे सासरच्या लोकांचे म्हणणे आहे. या आरोप प्रत्यारोपात एका खाजगी रुग्णालयात दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून गेली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद शमला. वैशाली ही निवृत्त सहाय्यक फौजदार सुरेश ब्राrाणे यांची मोठी मुलगी होती. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात पती संतोष प्रकाश गाढे, सासरा प्रकाश रुपचंद गाढे, सासु शोभा, दीर रितेश व योगेश गाढे या पाच जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पती संतोष व दीर रितेश या दोघांना अटक करण्यात आली आहे.विवाहिता 95 टक्के जळालीमोहाडी रस्त्यावरील आदर्श नगरात वैशाली गाढे या पती संतोष व मुलगी ओजल (वय 8) व मुलगा सोहम (वय 3) यांच्यासह राहत होत्या. संतोष हे एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला आहेत. गेल्या तीन दिवसापासून पती-प}ीत वाद सुरु होते. अशातच गुरुवारी सकाळी वैशाली यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा निरोप माहेरी मिळाला. भुसावळ येथील माहेरच्या मंडळींनी जळगाव गाठले. 95 टक्के जळाल्यामुळे वैशाली यांना आकाशवाणी चौकातील एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना दुपारी 3.42 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.वैशालीे यांच्या मृत्यूमुळे तिच्या आईने प्रचंड आक्रोश केला होता. रात्री आठ वाजता वैशालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.