जळगाव : रात्रीच्या गस्तीत गैरहजर राहणे व कागदोपत्री हजेरी दाखविणे पोलीस कर्मचा:यांना चांगलेच महागात पडले आहे. आधी तीन कर्मचा:यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर रविवारीही औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रकाश अमृत महाजन यांनाही पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी निलंबित केले आहे. दरम्यान, जळगाव शहर, एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.परिविक्षाधीन आयपीएस अधिकारीमनीष कलवानिया व परिविक्षाधीन उपअधीक्षक डॉ.संतोष गायकवाड हे दोन्ही अधिकारी गेल्या आठवडय़ात रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांना एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे सुनील आनंदा तेली या कर्मचा:याची लॉकअप डय़ुटी असताना ते गैरहजर होते. शहर पोलीस स्टेशनचे उमेश साळुंखे हे नाकाबंदी डय़ुटीत गैरहजर आढळून आले तर जिल्हा पेठचे हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वागळे यांची ठाणे अमलदार म्हणून रिझव्र्ह डय़ुटी होती ते देखील गैरहजर आढळून आले होते.दरम्यान, दोन दिवसापूर्वीही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार प्रकाश महाजन हे देखील रात्रीच्या गस्तीत गैरहजर आढळून आले. हे सर्व कर्मचारी कागदोपत्री डय़ुटीवर होते. या सर्व कर्मचा:यांचा अहवाल दोन्ही परिविक्षाधीन अधिका:यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे पाठविला होता. सुपेकर यांनी या सर्वाची चौकशी केली, त्यात दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.शहरात झाडाझडती घेणार रात्रीची गस्त सक्तीची करण्यात आली असताना बरेच कर्मचारी व अधिकारी कागदोपत्रीच डय़ुटी करीत असल्याचे लक्षात आल्याने आता शहरात अचानकपणे झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सुपेकर यांनी सांगितले. तीन पोलीस कर्मचारी व एका सहाय्यक फौजदारास निलंबित करण्यात आले असून प्रभारी अधिका:यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणा:या कोणत्याही अधिकारी व कर्मचा:याची यापुढे गय केली जाणार नाही.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकअमळनेरचे निरीक्षक वाघ यांची नव्याने चौकशीअमळनेरचे तत्कालिन निरीक्षक विकास वाघ यांची नव्याने चौकशी केली जात असून त्यात चौकशी अहवाल आल्यावर त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई होणार आहे. वेळप्रसंगी निलंबनालाही त्यांना सामोरे जावे लागेल असे संकेत आहेत.
सहाय्यक फौजदारही निलंबित
By admin | Published: February 20, 2017 1:29 AM