शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

शहरातील २३ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 9:04 PM

जिल्हा पुरवठा विभागातर्फे शहरातील ११२ दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती़ यापैकी ३१ दुकाने बंद आढळून आली होती़ त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या़ ३१ पैकी २३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली़ वितरण प्रणालीत फेरफार करुन अपहार केल्याप्रकरणी यातील ६ जणांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत़ . या धडक कारवाईने जिल्हाभरातील रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभागाची कारवाईसहा जणांवर गुन्हा दाखलचे संकेत ११२ दुकानांची केली होती तपासणी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि़ २ - जिल्हा पुरवठा विभागातर्फे शहरातील ११२ दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती़ यापैकी ३१ दुकाने बंद आढळून आली होती़ त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या़ ३१ पैकी २३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली़ वितरण प्रणालीत फेरफार करुन अपहार केल्याप्रकरणी यातील ६ जणांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत़दरम्यानआणखी२९ जणांना   नोटीसा देण्यात आल्या आहेत़ या धडक कारवाईने जिल्हाभरातील रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशान्वये २१ नोव्हेंबर रोजी शहरात तपासणीसाठी पुरवठा विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली होती़ यात २७ पथकांव्दारे १२० स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली होती़ बंद आढळून आलेल्या ३१ स्वस्त धान्य दुकानांना त्यांची अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबित करणे अथवा रद्द करणे, तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येवू नये, अशा स्वरुपाच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या़़़़तर कायमस्वरुपी परवाना निलंबित२३ दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ६ जणांबाबत निर्णय व्हायचा आहे तर २ जणांचे परवाने यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत़ निलंबित करण्यात आलेल्या रेशन दुकानदारांच्या १०० टक्के रेशनकार्ड तपासणी करण्यात येणार आहे़ तपासणीअंती दोष आढळला, अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास तर त्यांचे कायमस्वरुपी परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी सांगितले़ तपासणी करण्यात आलेल्या ११२ पैकी पुढील २९ जणांना अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबित करणे अथवा रद्द करणे, तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येवू नये, अशा स्वरुपाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत़ यातील काही कारवाईच्या रडारवर आहेत़पाच ते सहा जणांवर फौजदारी?यात पाच ते सहा स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशीनव्दारे स्वत: बोटाचे ठशांव्दारे अन्न वितरीत करण्यात आले तसेच रेकार्डनुसार धान्य वितरीत झाले असताना धान्याचा साठा आढळून आले, अशा स्वरुपाचा अपहार केल्याचे तपासणी निष्पन्न झाले असून सुनावणीअंती त्यांच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे संकेतही पुरवठा अधिकारी जाधव यांनी दिले आहेत़जिल्ह्यात नवीन १९८ रेशन दुकानेशहरे, गावांचा विस्तार लक्षात घेता, जिल्ह्यात विविध ठिकाणी आणखी १९८ नवीनदुकानांबाबतजाहीरनामाप्रसिध्दकरण्यातआलाआहे़स्थानिकस्वराज्यसंस्था,स्वयंसेवीसंस्था,सहकारीसंस्था व नंतर बचतगट याप्रमाणेपात्र संस्थांनी अर्ज करावेत,असे आवाहनही करण्यात आले आहे़ मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात आली असून समितीने अंतिम केलेल्या संस्था,अर्जदाराला परवाना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़