शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:16 PM

जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मेहरुण तलावात आढळून ...

जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाला नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथे काम करीत असताना नाथानी यांच्या घरासमोरच राहणाºया एका कुटुंबाने आजच्या दिवस धुणी भांडी करण्यासाठी तरुणीच्या आईला बोलावले. त्यामुळे आई तिकडे गेली. तेथील काम आटोपून परत नाथानी यांच्याकडे दुपारी दोन वाजता आली असता नाथानी यांची वहिनी नाशा नीलेश नाथानी यांनी मुलगी १२.३० वाजताच काहीही न सांगता काम अपूर्ण सोडून गेल्याच माहिती दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध करुनही तरुणीची माहिती मिळाली नाही. त्यामुळे सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.हाताला ओढणी बांधलेलीएकीकडे मुलीचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे सोमवारी सकाळी सात वाजता जे.के.पार्कला लागून असलेल्या मेहरुण तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका हाताला ओढणी होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे तरुणीच्या आई, वडीलांसह नातेवाईकांनी धाव घेतली. मुलीचा मृत्यूप्रकरणात त्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करावे व तरुणीबाबत संशय व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.एमआयडीसी पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी- या गुन्ह्याचा तपास दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. अपहरणाचा गुन्हा रामानंद नगरला तर अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. हा गुन्हा वर्ग करण्यासंदर्भात एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम दिवसभर सुरु होते. मृत्यूबाबत संशय असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सचिन मुंडे, रतिलाल पवार, सचिन पाटील, योगेश बारी व भूषण सोनार यांनी घटनेला सुरुवात झाल्यापासून तर शेवट होईपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तरुणी रविवारी संध्याकाळी पावसात तलावाच्याकाठी असल्याचे काही जणांनी पाहिल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.तरुण-तरुणी एकमेकाच्या संपर्कातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी व विशाल दोघंही एकमेकाच्या संपर्कात होते. दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. नाथानी यांच्या घरी तरुणीला भेटायला गेल्याबाबत विशाल याने पोलिसांकडे कबुली दिली आहे, मात्र त्यानंतर पुढे काय झाले माहिती नाही असे तो सांगत आहे.शवविच्छेदन अहवालात बºयाच प्रश्नांचा उलगडा होणार असल्याने पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव