जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात २४ जून ते ८ जुलै या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होण्यासाठी या पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरित उपचार या तत्वावर रुग्णांवर आवश्यत ते उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.प्रतिबंधात्मक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची अॅपद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली, त्या वेळी हा निर्णय घेणयात आला.यासह जिल्ह्यात एका दिवसात एक हजार नमुने तपासण्याची व्यवस्था उभी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले़ तसेच कोरोना योद्धांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉलसेंटरही सुरू करण्यात येणार आहे़
जळगाव जिल्ह्यात आजपासून संशयित रुग्ण शोध पंधरवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:35 PM