फैजपूर, जि.जळगाव : येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष आहे तर २४ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे.१७० वर्षाची परंपरा लाभलेल्या स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली. रथाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. १८४८ साली श्रीहरी महाराज यांनी निर्माण केलेल्या रथातून स्वयंभू विठ्ठलाच्या मूतीर्ची मिरवणूक काढण्यास सुरवात झाली असल्याची माहिती आहे, तर रथावर आरूढ होऊन भक्तांच्या भेटीला येणाऱ्या पांडुरंगाची मूर्ती ही स्वयंभू व साक्षात असल्याची आख्यायिका आहे.२३ रोजी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा रथोत्सव साजरा होणार आहे. या रथोत्सवाचे महाआरतीचे यजमान माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ हे असतील. दुपारी तीन वाजता महाआरती होऊन रथोत्सवाला प्रारंभ होईल. रथ गल्ली, लक्कड पेठ, कासार गल्ली, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड या मार्गाने रथ मिरवणूक जाऊन पुन्हा रथ गल्लीत येईल. यादरम्यान मिरवणुकीत फैजपूर, कोसगाव, पाडळसा, बामणोद, चिनावल, न्हावी, सावखेडा, कळमोदा, पिंपरुळ, येथील भजनी मंडळी सहभागी होतील. रथोत्सव मार्गावर रांगोळी करणाºयांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आलेले आहे.यावेळी विजेत्यांचे योग्य ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. २४ रोजी रात्री ७ ते ११ वाजेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणीची पालखीतून मिरवणूक निघेले. २५ रोजी दुपारी चार वाजता पुन्हा पालखी मिरवणूक होऊन गणपतीवाडी येथे दहीहंडी होईल. २७ रोजी काकडा आरती समाप्तीनिमित्त पक्षाळ पूजा होईल, असे संत खुशाल महाराज देवस्थानचे गादीपती प्रवीण महाराज यांनी कळविले आहे.
फैजपूर येथे २३ रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 6:57 PM
फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष आहे तर २४ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे.
ठळक मुद्देभेटी लागे जीवा : १७० वर्षांची अखंड परंपराउत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष २४ रोजी पालखी मिरवणूक