पाचोरा, जि.जळगाव : अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीयांनी प्रा.हिंमत मोरे यांचा वर्षश्राद्ध विधी आणि भोजन यासाठी खर्च न करता त्या पैशातून आधारवड केंद्रात गोरगरीब व भुकेल्यांना मिष्टान्न भोजन दिले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.येथील एम.एम.कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.हिंमत मोरे यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. १९ रोजी त्यांचे वर्ष श्राध्द होते. त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा श्राद्धानिमित्ताने पितरांना भोजन व इतर कोणत्याही विधीसाठी पैसा खर्च न करता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आधारवड केंद्रात गोरगरिबांना वरण-भात, पुरी, उसळ, जिलेबी, शेव असे भोजन दिले. यावेळी आशा मोरे, भाग्येश मोरे, प्रमिला मोरे, प्रा.कल्पना जंगम, प्रा.अरविंद जंगम यांच्यासह आधारवड केंद्राचे प्रवीण पाटील, महेंद्र अग्रवाल, भूषण देशमुख, राहुल पाटील, मतीन संदानशिव, रवी देवरे, बबलू पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश सोनार, गजेंद्र गुढेकर आदी उपस्थित होते. मोरे कुटुंबियांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पाचोरा येथे वर्षश्राद्धाऐवजी गरिबांना दिले गोड भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:05 PM
अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीयांनी प्रा.हिंमत मोरे यांचा वर्षश्राद्ध विधी आणि भोजन यासाठी खर्च न करता त्या पैशातून आधारवड केंद्रात गोरगरीब व भुकेल्यांना मिष्टान्न भोजन दिले.
ठळक मुद्देमोरे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रमवर्षभर होणाऱ्या विविध विधींना दिला फाटाआधारवड केंद्रात दिले मिष्ठान्न