मतीन शेख।मुक्ताईनगर : खान्देशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवसापासून आंबे खायला सुरवात होते. एरव्ही १२ ही महिने आंबे उपलब्ध असलेल्या महानगरात तील आंब्यांचा गोडवा देखील आखाजी पासूनच लाभतो. यंदाच्या अक्षयतृतीय् ला लॉक डाउनमुळे गावरान आंब्यांच्या पाठोपाठ निर्यात बंदीमूळे देवगडचा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात गोडवा देणार हे विशेष. कोरोना संकट लॉक डाउन, आणि मागणी अभावी यंदा आंब्याचे दर ३० ते ४० टक्के उतरले आहे.खान्देशाच्या मातीचा सुगंध काही औरच असून येथील परंपरा, चालीरीती सण उत्सव निसर्गाच्या सानिध्याशी जुळलेले ऋतुमानानुसार आहार विहार आणि फळांचे सेवन ही परंपरा जोपासली जाते. त्या मागील शास्त्रीय पूरक आणि तर्क शुद्ध कारणेही दिली जातात. ऋतुमानानुसार फळांचा आहार हा शारीरिक गरजेला पूरक गणला जातो. त्या मूळे फळांचा गोडवा खऱ्या अथार्ने त्या त्या ऋतुमानावर अधिक असतो. यामुळेच खान्देशात आखजीला आंबे खायला ख?्या अथार्ने सुरवात होते याच काळात खान्देशी गावरान आंबे बहरतात, तर आंबे बाजारात दक्षिणेतून बदाम, लालपटा, आणि साऊथ केशर अक्षय तृतीया पूर्वी बाजारात दाखल झाले आहेत पाठोपाठ गुजराती केसर, दसेरी लंगडा या आंब्याचे आगमन प्रतीक्षेत आहे.हापूसही आवाक्यातआंब्यांचा राजा हापूस यंदा सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. कोरोना मुळे निर्यात बंदी असल्याने आताच बाजारात रत्नागिरी हापूस पाठोपाठ देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. इतवेळी डझन आणि पेटीने विकल्या जाणाºया हापूसचे दर निर्यातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर असतात. त्यात निर्यात दर्जाचे हापूस आंबे हे ग्रामीण वजा शहरी अशा भागात पाहायलाही मिळत नव्हते, यंदा मात्र आता पासून घरपोहोच उपलब्ध करून दिले जात आहे. आणि दरात आता पासून घसरण दिसून येत आहे.दर ४० टक्के घसरलेकोरोना संक्रमण लॉककडाउनमुळे आंब्यांची आवक कमी आहे. त्याच बरोबर मागणी सुद्धा कमी आहे. आंबे बाजारात यंदा आंब्याचे दर सरारसरी ३० ते ४० टक्क्याने घसरलेले दिसून येत आहे. गेल्या वर्षी आखाजीच्या आठवडाभर अगोदर किरकोळ बाजारात बदाम ,लालपटा,साऊथ केशर या आंब्याचे दर १०० ते १२० दरम्यान होते यंदा हे दर ७० ते ८० रुपये दरम्यान आहे. पाठोपाठ घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० टक्के पर्यंत खाली आले आहे. असे असून ही अद्याप हवी तशी मागणी नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहे तर शेतकरी मालाला भाव नसल्याने हवालदिल झाला आहे.
आंब्यांचा ‘गोडवा’ यंदा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:15 PM