सोयगाव : सीताफळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगाव तालुक्यात दुष्काळातही कमी पाण्यावर आलेली गोड सीताफळे विक्रीसाठी परराज्यात पोहोचले आहे.अजिंठ्याच्या डोंगर रांगात असलेल्या जंगलात सीताफळांची मोठी झाडे आहे. जंगलातील रानमेवा वनविभागाने सर्वसामान्य पर्यंत पोहोचवला त्याची गोड चव कळाली आणि हळूहळू सीताफळाच्या लागवडीला सुरुवात झाली. सद्यस्थितीला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सीताफळाची लागवड झालेली आहे.थेट सुरतला होतेय विक्रीआॅक्टोबर महिन्यात सीताफळाच्या तोडणीला सुरुवात होते स्थानिक बाजारात मिळत नसल्यामुळे अनेक सीताफळ उत्पादक गुजरात राज्यातील सुरत येथे थेट विक्री करीत आहे. याठिकाणी त्यांना चांगला भाव मिळत आहे. जुलै-आॅगस्टमध्ये काही व्यापारी येऊन सीताफळाच्या भागाचा सौदा करून शेतकºयांना पैसे देतात. मात्र व्यापारी भाव व थेट विक्री याचा भाव यातील तफावत लक्षात आल्याने सीताफळ उत्पादक स्वत: विक्री करू लागले आहे.सिताफळाची तोडणी झाल्यावर त्याला आकारानुसार व नगाप्रमाणे व्यवस्थित पॅकिंग केले जाते. रात्री ही खोकी पॅक करून ट्रकद्वारे सुरत येथे रवाना केली जाते.निसर्ग कवी ना.धों.महानोर यांनी दिली ओळखसीताफळाची खरी ओळख सुरतच्या बाजारात पळसखेडा येथील निसर्ग कवी ना.धों.महानोर यांनी दिली आहे. यांच्या बागेतील गोड सीताफळे प्रसिद्ध आहे. भरघोस उत्पादन घेणाºया ही सीताफळाची बाग पाहण्यासाठी राज्य व परराज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने याठिकाणी येतात. यंदा सोयगाव तालुका दुष्काळाने होरपळला आहे. खरीप हंगामाचे तीन तेरा झाले आहे. पानमळे व केळीची बाग संकटात आहे. रब्बीचा हंगाम येणार नाही मात्र सीताफळाने साथ दिली आहे.लागवडीनंतर तीन वर्षात सीताफळाच्या झाडाला फळे यायला सुरुवात होते. मे महिन्यात झाडाची कटाई करावी लागते. सिताफळावर पडणाºया मिलीबग व इतर रोगावर कीटकनाशकाची फवारणी करावी लागत असल्याचे गलवाडे येथील शेतकरी विठ्ठल जाधव यांनी सांगितले.सध्या शंभर ते दीडशे रुपये प्रति डझन या भावाने विकली जात आहे. मात्र काही दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे. ५० ग्रॅम ते अर्धा किलोपर्यंतचे सीताफळे बाजारात उपलब्ध आहेत.
सोयगावच्या सीताफळाचा परराज्यात गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:09 PM
सीताफळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगाव तालुक्यात दुष्काळातही कमी पाण्यावर आलेली गोड सीताफळे विक्रीसाठी परराज्यात पोहोचले आहे.
ठळक मुद्देसिताफळाची विक्री १०० ते १५० रुपये डझनशेतकरी करताहेत थेट गुजराथमध्ये विक्रीनिसर्ग कवी ना.धों.महानोर यांनी दिली सिताफळाला ओळख