जळगाव : भुसावळ तालुक्यातील कुºहे पानाचे येथील स्वाईन फ्लू सदृष्य आजाराचा तरुण रुग्ण जळगावातील पारीख पार्कनजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहेत. डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचाही शिरकाव होत असल्याने भीतीचे वातावरण पसरत आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या सोबतच कुºहे पानाचे येथील एका बालिकेचाही नुकताच डेंग्यू सदृष्य आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा याच गावात स्वाईन फ्लू सदृष्य आजाराचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सदर तरुणाला बुधवारी संध्याकाळी जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फुफ्फुसामध्ये निमोनिया असल्याचे निदान झाले असून स्वाईन फ्लूच्या शक्यतेने त्याचे नमुने मुंबई येथे पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर स्वाईन फ्लू आहे की नाही याची खात्री होणार असल्याची माहिती मिळाली.
भुसावळ तालुक्यातील कुºहे पानाचे येथील स्वाईन फ्लू सदृष्य रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:26 PM