भुुसावळ : शिवजयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीत पाच जणांवर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १९ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव नाक्याजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध दंगल व अॅट्रासिटीचा गुन्हा केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिठाच्या गिरणी जवळ शिवजयंती मिरवणूकीत सहभागी झालेल्या मुकेश धर्मा राखुंडे व जितू भालेराव, पंकज बाविस्कर, भरत महाजन (रा. भुसावळ) यांना या मिरवणुकतीत तुमचे काय काम? असे जातीवाचक बोलून जातीवाचक शिविगाळ करुन मुकेश पाटील, अक्षय पाटील, भामरे, सिमेंट वाल्याचा मुलगा, हर्षल उर्फ शिवाजी (तीघांची पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा, भुसावळ यांच्यासह ८-१० आरोपींनी तलवार, प्लॅस्टीक पाईप व दाड्यांने मारहाण करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव होता. शहर पो.स्टे.चे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शांतता प्रस्तापित केली. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या मुकेश राखुंडे व जितू भालेराव यांच्यासह इतर जखमीना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपास डीवायएसपी गजानन राठोड करीत आहे.
पाच जणांवर तलवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 10:42 PM