उटखेडा, ता. रावेर : नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या कविसंमेलनात ‘तडवी भिल्लोरी’ भाषेने प्रथमच सहभाग नोंदवला.
भारत सरकार साहित्य अकादमी, दिल्लीद्वारा जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९, १० आणि ११ ऑगस्ट दरम्यान 'भारत ७५ आदिवासी कविता की तलाश' या शीर्षकाखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. ७५ कविंनी या कविसंमेलनात आदिवासी जमातीच्या बोलीभाषेतून कविता सादरीकरण केले. भारताच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, विदर्भ आणि इतरही काही प्रांतात हजारो वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या तडवी आदिवासी जमातीच्या ‘तडवी भिल्लोरी’ बोलीचे प्रतिनिधित्व करत साहित्यिक, गीतकार कवी महेमूद अहमद तडवी यांनी सहभाग नोंदवला.
कवी महेमूद तडवी हे रा. उटखेडा, ता. रावेर येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांनी ‘भारत ७५ आदिवासी कविता की तलाश’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. याबद्दल तडवी बांधवांसह इतरांनी त्यांनी अभिनंदन केले.