चोपडा : भाजपतर्फे कोरोना काळामध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद असताना फक्त देखावा म्हणून घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र त्यांचे राजकारणातील पितळ उघडे पडले असून, भाजप पदाधिकाºयांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. निवेदन सोमवारी तहसीलदारांना देण्यात आले.राजकीय स्टंट बाजी म्हणून भाजपतर्फे घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. हे करत असताना मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताई यांच्या पवित्र मंदिरात आंदोलन करीत असताना खासदार रक्षा खडसे, राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई मंदिरात चप्पल घातल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. शिवसेनेतर्फे भाजपच्या पदाधिकाºयांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तमाम वारकरी व हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नोंदविलेले निवेदन शिवसेना पदाधिकाºयांनी चोपडा येथे तहसीलदार अनिल गावीत यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, माजी उपसभापती एम.व्ही.पाटील, गटनेते भैय्या पवार, गटनेते युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी, वासुदेव महाजन, नंदू गवळी, युवासेना शहर संघटक, प्रवीण जैन, शहर उपप्रमुख भरत धनगर, एकनाथ महाजन, मयूर वाकळे उपस्थित होते.
घंटानाद आंदोलनात मंदिरात चपला घालून आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा-शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 7:23 PM