लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भुसावळ तालुक्यातील कुºहे-पानाचे, खंडळा, साकरी या गावांमधील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार वितरित केला जातो याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दखल घेतली असून यात दोषी असलेल्या संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल त्यांनी घेतली आहे.२९ जून रोजी जि.प.सदस्यांनी भुसावळ तालुक्यातील काही शाळांमध्ये जाऊन शालेय पोषण आहार प्रकरणी तपासणी केली होती. यामध्ये तूर डाळ व उडीद डाळ निकृष्ट आढळून आली होती. या प्रकरणी सावकारे यांनी २ जुलै रोजी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे या प्रकरणी तक्रार करत संबंधित पुरवठादार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली होती. शिक्षणमंत्र्यांकडून मंगळवारी रात्री उशिरा पल्लवी सावकारे यांना पत्र पाठवून संबंधित अधिकाºयांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पुढील आठवड्यात अहवाल प्राप्त होणारया प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. कुºहे-पानाचे, खंडळा, साकरी येथील शाळांमधील मालाचे नमुने नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर यांनी दिली. पुढील आठवड्यात या प्रकरणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिक येथे बैठकीला आलो असल्याने शिक्षण मंत्र्याच्या आदेशाबाबत अद्याप माहिती कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय पोषण आहार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार
By admin | Published: July 06, 2017 12:12 AM